ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

परभणी : धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या रायरेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीसेर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ११ एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, सचिव प्रा.शीतल सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे विभाग प्रमुख श्री खपरले यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून श्री.भुसारे, पी.व्ही.कदम लाभले. या पी.व्ही. कदम यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शेख यांनी केले. श्री डोंबे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सर्व समन्वयक,विभाग प्रमुख,सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!