योगेश ढवारे यांना राज्यस्तरीय बालरक्षक कार्यगौरव पुरस्कार

योगेश ढवारे यांना राज्यस्तरीय बालरक्षक कार्यगौरव पुरस्कार

नाशिक येथे महाराष्ट्र शासन बालरक्षक टीम व किनो एज्युकेशन सोसायटीने केले सन्मानित

सेलू : येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील राज्यपुरस्कारप्राप्त शिक्षक योगेश ढवारे यांना नाशिक येथील किनो एज्युकेशन सोसायटी व महाराष्ट्र राज्य बालरक्षक टीमच्या वतीने दिला जाणारा बालरक्षक कार्यगौरव पुरस्कार मान्यवरांच्या प्रमुख हस्ते नाशिक येथे प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी व्यासपिठावर शिक्षण उपसंचालक डॉ.शोभा खंदारे, शिक्षण सहसंचालक ई.जे.ठाकरे, उपसंचालक अरुण जाधव, अकोल्याच्या शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

बालरक्षक चळवळीतील कार्याचा हा सन्मान असून यि पुरस्काराने आणखी जबाबदारी वाढली आहे. अजून जोमाने काम करण्यासाठी हे महत्वाचे आहे, असे श्री.ढवारे म्हणाले. कार्यक्रमाला महाराष्ट्रातून तब्बल ४० बालरक्षक सहभागी झाले होते. सूत्रसंचालन संगमनेर डाएटचे जेष्ठ अधिव्याख्याता संदीप वाकचोरे यांनी केले, तर आभार विनोद राठोड यांनी मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!