परभणीत विचारप्रवर्तक देखाव्यांनी वेधले लक्ष 

परभणीत विचारप्रवर्तक देखाव्यांनी वेधले लक्ष 

फुले-शाहू-आंबेडकर जयंती महोत्सव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात 

परभणी : येथील सर्वधर्मीय फुले-शाहू-आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने प्रज्ञासूर्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्याजवळ विचारवेधक देखाव्याचे पुष्पवृष्टी करुन लोकार्पण करीत अभिवादन करण्यात आले. या देखाव्याने लक्ष वेधून घेतले.

या वेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, दीपकराव देशमुख, डाॅ.विवेक नावंदर, यशवंत मकरंद, डाॅ.सुनील जाधव, मुंजाजी शेवाळे, डाॅ.सुरेश हिवराळे, सुशिलकुमार देशमुख, त्र्यंबक वडसकर, डाॅ.परमेश्वर साळवे, डाॅ.संघमित्रा साळवे, सुनील ढवळे आदी मान्यवर ऊपस्थित होते.या देखाव्यात आरबीआयबॅंक, भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आणि महाबोधी महाविहार, बुध्दगया येथील सध्यस्थिती साकारली आहे. देखाव्याची संकल्पना सुनील ढवळे यांची तर निर्मिती चित्रकार राजा कांबळे यांची आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!