डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडून अभिवादन
परभणी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
.