जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासोबत चुकीची कागदपत्रे जोडली; गुन्हे दाखल

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासोबत चुकीची कागदपत्रे जोडली; गुन्हे दाखल

आवश्यक आणि योग्य कागदपत्रे जोडण्याचे तहसीलदारांचे निर्देश

परभणी : तहसील कार्यालयाकडून जन्म-मृत्यू नोंदणी अर्जाच्या संचिकेसोबत सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली असता तपासणीमध्ये ३ अर्जदारांचे आधारकार्ड वेगवेगळ्या राज्यातील असल्याचे आढळून आले असून, ते सांचा या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी सांगितले आहे.

या पडताळणी दरम्यान दोन जणांचे आधारकार्ड हे तेलंगणा व एकाचे गुजरात येथील आढळून आले आहे. त्यानंतर पुनर्तपासणी केली असता ७ अर्जदारांच्या टिसीमध्ये खाडाखोड केल्याचे आढळून आले आहे. अशा एकूण १० अर्जदारांवर गुन्हे नोंदविले आहेत. तसेच निर्गमित आदेशासोबत जोडलेली टिसी/निर्गम उतारा यांची संबंधित ५६ शाळा/महाविद्यालय प्रमुख यांच्यामार्फत एकूण १ हजार ५२१ टिसी/निर्गम उता-यांची पडताळणी केली असता त्यापैकी ३५ शाळांचा अहवाल या कार्यालयात प्राप्त झालेला आहे. त्या प्राप्त अहवालांपैकी ७ अर्जदारांनी अहवालानुसार नावात बदल केलेला तसेच नावात तफावत आढळून आली आहे. असा उल्लेख करुन संबंधित शाळा-महाविद्यालयांनी अहवाल सादर केला आहे. त्यामुळे या अहवालानुसार एकूण ७ अर्जदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशा एकूण १७ अर्जदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी कळविले आहे.

निर्गमित केलेल्या सर्व आदेश संचिकेची तपासणी करण्यात आली असून या संचिकेसोबत टिसी-निर्गम उतारा इ. शैक्षणिक कागदपत्रे जोडण्यात आलेल्या एकूण १ हजार ५२१ संचिका आहेत. तसेच टिसी-निर्गम उतारा इ. शैक्षणिक कागदपत्रे जोडलेली नाहीत, अशा एकूण ६७१ संचिका आढळून आल्या आहेत.

जन्म-मृत्यू आदेश निर्गमित केलेल्या संचिकेस टिसी-निर्गम उतारा इ. शैक्षणिक कागदपत्रे जोडण्यात आली आहेत. त्यांच्या सत्यतेबाबत पडताळणी करण्यासाठी संबंधित ५६ शाळा-महाविद्यालय प्रमुखांना त्यांच्या मूळ अभिलेखावरुन तपासणी करुन त्या नोंदीबाबत अहवाल सादर करण्याचे कळविले आहे. तसेच टिसी अथवा निर्गम उता-यांची तपासणी करुन देण्याबाबत सूचना देण्यासाठी बैठक आयोजित करून संबंधित शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांना पत्र देण्यात आले होते. त्यानुषंगाने संबंधित ३५ शाळा-महाविद्यालयांचा‌ अहवाल प्राप्त झाला आहे.

त्यानंतर ३५ संबंधित शाळा-महाविद्यालय प्रमुखांनी टिसी-निर्गम उता-यांची तपासणी करुन अहवाल सादर केला आहे. त्या अहवालामध्ये नावात बदल करुन, तसेच नावात तफावत आढळून आलेली आहे. असा उल्लेख करुन अहवाल सादर केला आहे. या अहवालाच्या अनुषंगाने ७ अर्जदारांवर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

तसेच निर्गमित आदेशाच्या संचिकेस टिसी-निर्गम उतारा जोडण्यात आलेला नाही. अशा एकूण १०३ अर्जदारांना समक्ष सुनावणी कामी मूळ कागदपत्र घेऊन बोलविण्यात आले. व समक्ष मूळ कागदपत्रे तपासण्यात आलेली आहेत. त्यापैकी उपस्थित ४० अर्जदारांच्या सुनावणीमध्ये त्यांनी पासपोर्ट, शासनाचे ओळखपत्र, निर्गम उत्तारा, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान कार्ड, आधारकार्ड, अशा प्रकारे कागदपत्रे दाखल केली आहेत.

या कार्यालयामार्फत नायब तहसिलदार यांचे स्तरावरुन एकूण ११४ जन्मे दाखले आदेश निर्गमित करण्यात आले आढळून आहेत. मा.उपसचिव, महाराष्ट्र शासन यांचे पत्र संकीर्ण/२०२५/प्र.क्र. ०३/ई-१अ दिनांक १७ मार्च, २०२५ चे अनुषंगाने या कार्यालयाने दिनांक २५ मार्च २०२५ रोजी एकूण ११४ निर्गमित जन्मे दाखले आदेश याव्दारे रद्द केले आहेत. या निर्गमित आदेश प्रकरणी तपासणीची कार्यवाही करणे चालू आहे.

तसेच ६७१ पैकी १२३ अर्जदारांना प्रत्यक्ष मूळ कागदपत्रे तपासणी कामी उपस्थित राहणेबाबत पत्र दिले आहे. यानंतरही निर्गमित आदेशाची तपासणीची कार्यवाही चालू असून तपासणीत आढळून आलेल्या बाबीवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे तहसीलदार डॉ. संदिप राजपुरे यांनी कळविले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!