नूतन विद्यालयाच्या सान्वी, तन्मय यांचे घवघवीत यश

नूतन विद्यालयाच्या सान्वी, तन्मय यांचे घवघवीत यश

राज्यस्तरीय बालवैज्ञानिक स्पर्धेत सुर्वण व रौप्य पदकांचे मानकरी

सेलू : बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने आयोजित  राज्यस्तरीय डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा २०२४-२५ मध्ये सेलू येथील नूतन विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत इयत्ता सहावीतील सान्वी गजानन शितळे हीने सुर्वण पदक, तर तन्मय जयकिशन भुतडा याने रौप्यपदक मिळवले आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत विज्ञान विषयातील गोडी निर्माण करणे व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा उद्देश असतो. इयत्ता सहावी व नववी या दोन स्तरांवर दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धेत यंदा राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या लेखी चाचणी, प्रयोगात्मक चाचणी, प्रकल्प सादरीकरण व मुलाखत या तीनही टप्प्यांत सान्वी व तन्मय या दोघांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. अंतिम फेरीत सान्वीने आपले वैज्ञानिक कौशल्य प्रभावीपणे सादर करत सुर्वण पदक मिळवले, तर तन्मय भुतडा याने उत्तम कामगिरी करत रौप्यपदक आपल्या नावे केले. या यशामागे परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे पाठबळ हे तितकेच महत्त्वाचे ठरले आहे. शाळेच्या वतीने तसेच विविध स्तरातून सान्वी आणि तन्मय यांचे अभिनंदन होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!