चिमुकल्यांनी घेतला वासंतिक शिबीराचा आनंद 

चिमुकल्यांनी घेतला वासंतिक शिबीराचा आनंद 

सेलूतील नूतन पूर्व प्राथमिक विभागाचा उपक्रम

चिमुकल्यांनी घेतला वासंतिक शिबीराचा आनंद 

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन पूर्व प्राथमिक विभागाच्या वतीने ८ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत आयोजित वासंतिक शिबिरातील विविध उपक्रमांचा चिमुकल्यांनी आनंद घेतला

शिबिरामध्ये कागदी फुले तयार करणे, चित्र रंगविणे, योगा, नृत्य, वेशभूषा, हनुमान जन्मोत्सव निमित मुलांनी हनुमान तसेच राम, लक्ष्मण, सीतामातेची वेशभूषा सादर केली. विवीध वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले

संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, सहचिटणीस जयप्रकाशजी बिहाणी, बालवाडी समितीचे अध्यक्ष राजेशजी गुप्ता, केंद्रप्रमुख एकनाथ जाधव, मुख्याध्यापक सुखानंद बेंडसुरे, समन्वयक अनिल रत्नपारखी, उल्हास पांडे, रमेश काळे यांनी भेटी देऊन बालकांची कौतुक केले व शिबिरास शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्या श्रीमती करुणा बागले यांनी मोलाचे मार्गदर्शन करतांना सांगितले की, पालकांनी मुलांसमोर मोबाईल न वापरता त्यांच्यासमोर पुस्तके वापरावी, चित्र काढावी ज्याचे अनुकरण मुले करतील. तसेच सरोज मंडलिक यांनी मुलांना कागदापासून फुले तयार करण्याचे शिकवले शिक्षक अर्जुन पंडित यांनी मुलांना सुदृढ राहण्यासाठी चांगल्या सवयी शिकवल्या तसेच रामकौर कुंभार यांनी मुलांना छान गाणी शिकवली व खेळ घेतला, तर शितल शेळके यांनी मुलांना छान गोष्ट सांगितली. श्रुती खंदारे आणि शितल खंदारे यांनी मुलांना योगासने शिकवली. पालकांनी शिबिरात मोलाचा प्रतिसाद दिला. १४ एप्रिलला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक पर्यवेक्षिका छाया बोबडे यांनी केले. मनिषा बायस ठाकुर यांनी सूत्रसंचालन केले. शिबिराचा अहवाल अनुपमा नाटकर यांनी सादर केला. सुनिता देवकर यांनी आभार मानले. स्वागत गीत संध्या कुलकर्णी यांनी सादर केले. शिबिरासाठी राधा ताठे, आशा शिंदे, आरती मेटकर, कविता टाक, प्रल्हाद पवार यांनी परिश्रम घेतले.

०००

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!