सेलू पालिकेसमोर रहिमखान पठाण यांचे बेमुदत उपोषण

सेलू पालिकेसमोर रहिमखान पठाण यांचे बेमुदत उपोषण

नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर उपोषण, अनेकांचा पाठिंबा

परभणी : सेलू नगरपालिका अंतर्गत घरकुल योजना, भाडेकरूंना लावलेले अधिमूल्य, घरपट्टी शास्ती, नामांतर कर आदी विविध प्रश्नांवर माजी नगरसेवक तथा सेलू शहर काँग्रेसचे अध्यक्ष रहिम खान पठाण यांनी मंगळवारपासून (१५ एप्रिल) सेलू नगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. घरकुल योजनेतील मंजुर लाभधारकांना तत्काळ अनुदान वितरीत करणे, नगर परिषद भाडेकरु दुकानदारांना लावलेले अधिमूल्य तत्काळ रद्द करणे. नगर परिषद भाडेकरू दुकानदारांना केलेली अवाजवी भाडे वाढ कमी करणे, घरपट्टी धारकांना लावलेली शास्ती रद्द करणे. नामांतरासाठी रजिस्ट्रीच्या १ टक्के कर रद्द करणे. आदी मागण्या मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. उपोषण स्थळी माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, मिलिंद सावंत, विनोद तरटे आदींसह अनेकांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!