सेलूत लॉयन्स क्लबच्या पाणपोईचे उद्घाटन
सेलू : जनकल्याण आणि लोक सेवेच्या उपक्रमात लॉयन्स क्लब नेहमी सर्वात अग्रेसर आहे, असे प्रतिपादन सपोनि प्रभाकर कवाळे यांनी केले. येथील लॉयन्स क्लबच्या वतीने १६ एप्रिलरोजी नूतन रोडवर पाणपोईच्या शुभारंभ श्री कवाळे यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी शिवनारायण मालाणी, राजेंद्र सराफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
तालुकाध्यक्ष सुयश पटवारी, सचिव डॉ.बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष अजित सराफ, कोषाध्यक्ष डॉ.शैलेश मालाणी, सहसचिव डॉ.अनुराग जोगदंड, डॉ.उमेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गोल्डन मेंबर दतात्रय सोळंके, रवी बोराडे, डॉ.परेश बिनायके, डॉ.सुदर्शन मालाणी, डॉ.कुंदन राऊत, अनुप गुप्ता, जयसिंग शेळके, कृष्णा काटे, सुभाष मोहकरे, कैलास करवा, सुनील करवा, बन्टी जाधव, शेख सोहेल, बाळू डासाळकर आदींची उपस्थिती होती.