परभणीचा ‘टीएलटी-१०’ तिळाचा वाण आता देशभरात फुलणार 

परभणीचा ‘टीएलटी-१०’ तिळाचा वाण आता देशभरात फुलणार 

‘वनामकृवि’च्या संशोधनाला केंद्र सरकारची मान्यता

परभणीचा 'टीएलटी-१०' तिळाचा वाण आता देशभरात फुलणार 

सकाश न्यूज नेटवर्क, परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्राने विकसित केलेल्या टीएलटी-१० या उत्कृष्ट तीळ वाणाला केंद्र सरकारकडून क्षेत्रवाढीस देशपातळीवर अधिकृत मान्यता मिळाली आहे. केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वाण अधिसूचना व प्रसारण समितीच्या बैठकीत बैठकीत मान्यता मिळाली आहे. या यशाद्वारे केंद्राने सातत्याने उत्कृष्ट कार्य करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. ही मान्यता मिळाल्यामुळे टीएलटी-१० वाणास खरीप तसेच रब्बी उन्हाळी हंगामात लागवडीसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा (झोन-१), तसेच गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील तेलंगणा भाग या राज्यांतही (झोन-३) खरीप हंगामात लागवडीसाठी मान्यता देण्यात आली आहे. या वाणाला ८ ऑक्टोबर २०२४ रोजी अधिसूचित करण्यात आले होते.

या संशोधनामागे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन असून, संशोधन संचालक डॉ.खिजर बेग, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.हिराकांत काळपांडे आणि इतर शास्त्रज्ञांचे योगदान मोलाचे आहे.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनीदेखील टीमचे अभिनंदन करत सांगितले की, या नव्या वाणाचा प्रसार प्रभावीपणे करण्याचा विद्यापीठाचा संकल्प असून, या वाणाचे बियाणे लवकरच देशभरात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

या वाणांच्या विकासामध्ये प्रभारी अधिकारी डॉ.मोहन धुप्पे, कनिष्ठ पैदासकार डॉ. शिवशंकर पोले तसेच तेलबिया संशोधन केंद्रातील वैज्ञानिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

टीएलटी-१० वाणाचे वैशिष्ट्ये

टीएलटी-१० वाण ९०-९५ दिवसांत परिपक्व होतो आणि ७ ते ८ क्विंटल प्रति हेक्टर इतके उत्पादन देतो. या वाणामध्ये ४५.२% तेलाचे प्रमाण असून, मँक्रोफोमीना, मुळ व खोडकूज, फायलोडी यांसारख्या रोगांवर तसेच पाने गुंडाळणारी व बोंड पोखरणारी अळी यांसारख्या कीटकांवरही सहनशीलता आहे.

टीएलटी-१० वाणामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम आणि गुणवत्तापूर्ण तीळ उत्पादनाची संधी मिळणार आहे. देशातील तीळ उत्पादनात आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होवून एक नवा अध्याय सुरू होईल. संशोधनात सहभागी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन ! – प्रा.डॉ. इन्द्र मणि, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी 

परभणीचा 'टीएलटी-१०' तिळाचा वाण आता देशभरात फुलणार 

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!