पहलगाम घटनेच्या निषेधार्थ आज परभणी जिल्हा बंदचे आवाहन

पहलगाम घटनेच्या निषेधार्थ आज परभणी जिल्हा बंदचे आवाहन

परभणी : जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथील पर्यटनस्थळी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने गुरुवारी,२४ एप्रिलरोजी संपूर्ण जिल्ह्यात बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
सकल हिंदू समाजाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करीत पहलगाम येथील पर्यटनस्थळी हिंदू पर्यटकांवर धर्म विचारुन अतिरेक्यांनी केलेल्या हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. गुरुवारी संपूर्ण जिल्हा बंदची हाक दिली आहे. सायंकाळी ५ वाजता शनिवार बाजारातून जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात येणार असून प्रशासनाने या गोष्टीची दखल घ्यावी व सकल हिंदू समाजाच्या संतप्त भावना वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन केले आहे.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!