पहलगाम घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद

पहलगाम घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद

परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

परभणी : जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथील पर्यटनस्थळी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने गुरुवारी,२४ एप्रिलरोजी संपूर्ण जिल्ह्यात बंदचे आवाहन करण्यात आले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, परभणी शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला.

परभणी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले. पहलगाम येथील पर्यटनस्थळी हिंदू पर्यटकांवर धर्म विचारुन अतिरेक्यांनी केलेल्या हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. सायंकाळी ५ वाजता शनिवार बाजारातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यात ठिकठिकाणी व्यापाऱ्यांसह मुस्लिम बांधवांनी बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवित पाठिंबा दिला. आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सेलू येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने २३ एप्रिल रोजी सायंकाळी निषेध रॅली काढण्यात आली होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!