भारतीय स्टेट बँक : अकरा शाखांच्या स्वतंत्र कर्ज मंजुरी शाखेचे सेलूत उद्घाटन

भारतीय स्टेट बँक : अकरा शाखांच्या स्वतंत्र कर्ज मंजुरी शाखेचे सेलूत उद्घाटन

शेती विषयक, शैक्षणिक व व्यावसायिक कर्जाच्या पन्नास लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाना मंजुरी मिळण्याची व्यवस्था 

सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : येथील जिंतूर रोडवरील भारतीय स्टेट बँक एएमसीसी या कर्ज मंजुरी शाखेचे उद्घाटन एसबीआयचे नांदेड

झोनचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री प्रियकुमार सारिगला यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परभणी रिजनल ऑफिसचे रिजनल मॅनेजर सम्राट पुरकायस्थ व एएमसीसीचे चीफ मॅनेजर दीपक देसाई उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रियकुमार सारिगला यांच्या हस्ते ग्राहकांना कर्ज मंजुरी पत्र देण्यात आले.‌ श्री सारगिला म्हणाले की, ग्राहकांचे कर्ज प्रकारणाला संबंधित शाखेत विलंब होत असल्याने यामुळे भारतीय स्टेट बँकने आपल्या सेलूची निवड केली यामुळे शेती विषयक कर्ज, शैक्षणिक कर्ज व व्यावसायिक कर्जाच्या पन्नास लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाना मंजूरी मिळेल. यामुळे परभणी येथे आपणास जाण्यासाठी गरज नाही तर भविष्यात पन्नास लाखांच्या वरिल व्यवसायिक कर्जाना आम्ही येथे मंजूरीसाठी प्रयत्न करत आहोत.

तसेच छोटे छोटे एसबीआयचे ग्राहकांना येथेच कर्जाच्या फाईल्सना मंजूरी मिळेल. जिंतूर रोडवरील ही शाखा वातानुकूलित यंत्रणा सज्ज अशी शाखा आहे. एसबीआयच्या ग्राहकांच्या सोयीसाठी ही शाखा स्थापन झाली असून यामुळे एसबीआयच्या ग्राहकांना याचा फायदा होईल

सेलू, पाथरी, मानवत, जिंतूर या शहरातील दोन दोन शाखा तर बोरी, झरी, देवगाव फाटा या अकरा शाखांच्या कर्जांच्या फाईल्स येथे मंजुरीसाठी येतील. या शाखेत एकूण आठ कर्मचारी कार्यरत असतील असे मुख्य शाखाधिकारी एएमसीसीचे चीफ मॅनेजर दीपक देसाई यांनी माहिती देतांना सांगितले. या कार्यक्रमासाठी सर्वच अकरा शाखेचे शाखा अधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता दीपक राऊत, अभय बोरडकर, शशिकांत वराडे, सुमित भरदम, हरीश बारस्कर , किरण तळपे , बाबुराव ताठे , शेख कलीम, गणेश तांबोळी व कैलास नजान यांनी मेहनत घेतली. प्रास्ताविक प्रवीण जायभाय यांनी केले, तर आभार शशिकांत वराडे यांनी मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!