श्री शिव आराधनेचे फळ निश्चित मिळते : महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज

श्री शिव आराधनेचे फळ निश्चित मिळते : महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज

रांजणी येथील श्रीरूद्रायेश्वर मंदिरात शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण सोहळा उत्साहात, शिवभक्तांची मोठी उपस्थिती

श्री शिव आराधनेचे फळ निश्चित मिळते : महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज

सकाश न्यूज नेटवर्क, जालना : रांजणी (रेल्वे स्टेशन) येथील विरेगाव रस्त्यावरील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रम परिसरात उभारण्यात आलेल्या श्री रूद्रायेश्वर महादेव मंदिरात शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना, लघुरुद्र याग व कलशारोहण सोहळा उत्साहात पार पडला.
यानिमित्ताने २२ एप्रिल ते २५ एप्रिलपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री श्री १००८ महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांनी श्रीशिवमहापुरण कथेचे निरूपण केले. कथेदरम्यान गुरूवारी श्रीशिवपार्वती विवाह सोहळ्याचा प्रसंग सादर करण्यात आला.

श्री शिव आराधनेचे फळ निश्चित मिळते : महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज

या वेळी शिवगिरी महाराज म्हणाले, की शिवशंकर सर्वांचे कल्याण करणारा आहे. शिव आराधनेचे फळ भक्तांना निश्चित मिळते. त्यासाठी उपासना दृढ असली पाहिजे. आयुष्यात संकटांना कधीच घाबरून जाऊ नका. त्याला समर्थपणे सामोरे जा, असे महाराजांनी सांगितले.

मंगळवारी गावातून शिवलिंग मूर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. दररोज महाभिषेक, याग, भजन, प्रवचन व शिवमहापुराण कथा झाली. २५ एप्रिलरोजी पूर्णाहूती, शिवलिंग मूर्ती स्थापना झाली. राघवगिरीजी महाराज व शिवगिरीजी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण झाले. महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली. सोहळ्यामध्ये गौतम देशमुख, अमोल देशमुख, राहूल सरकटे व रघुनाथ भारस्कर यांनी अन्नदान सेवा केली. गावातील लेकी बाळींसह पंचक्रोशीतील शिवभक्तांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज शिष्य परिवार तसेच रांजणी येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.

श्री शिव आराधनेचे फळ निश्चित मिळते : महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज

श्री शिव आराधनेचे फळ निश्चित मिळते : महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!