दुधनासह करपरा, कसुरा नद्यांचे खोलीकरण करा
सेलू तालुका दबाव गटाची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी
सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : सेलू तालुक्यातील दुधना, करपरा व कसुरा नद्यांचे पुनर्रजीवन, खोलीकरण करण्याची मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांना २४ एप्रिल रोजी पाठवलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सेलू तालुक्यात दुधना, कसुरा व करपरा या महत्वाच्या नद्या आहेत. ज्यामध्ये केवळ पावसाळ्यातच पाणी असते. दुधना नदीवर ” लोअर दुधना धरण” बांधण्यात आलेले आहे. तीनही नद्यांचे लाभक्षेत्रात सेलू तालुक्यातील समावेश साधारणतः २० ते २५ गावांचा आहे. गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने कमी होणारा पाऊस व बेसुमार वाळू उपसा यामुळे तीनही नद्यांचे पात्र असमान झालेले आहे. यातील करपरा नदीचे पात्र ठिकठिकाणी आपोआप बदलले असून सर्व नद्यांचे पात्र हे अत्यंत उथळ झालेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात देखील या तीन नद्यांमध्ये पाणी साठवणूक होऊच शकत नाही.
त्यात सातत्याने अतिवृष्टी झाली, की लगतच्या शेतीचे प्रचंड नुकसान होते. शेतकरी वर्ग अत्यंत परेशान होतो. नाहक नुकसान झाल्याने प्रचंड प्रमाणात या नद्यांचे परिसरातील शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे या तीनही नद्यांचे खोलीकरण करणे गरजेचे व आवश्यक आहे. त्याचा लाभ निश्चितच नद्यांचे जवळील गावांना होणार आहे. जमिनीतील पाण्याची पातळीवर वाढण्यास मदत होईल. खोलीकरणासोबत सर्वेक्षण करून बंधारे करण्यात यावे. यासाठी तातडीने पाऊले उचलणे जरुरीचे आहे. ज्यामुळे तालुक्यातील दुधना करपरा व कसुरा या नद्यांचे क्षेत्रात येणाऱ्या जवळपास ५० ते ६० गावातील शेतकर्यांना थेट फायदा होईल. या प्रकरणी तत्काळ सकारात्मक निर्णय करून जनतेस न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर ॲड.श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, गुलाब पौळ, इसाक पटेल, सतीश काकडे, मुकुंद टेकाळे, दिलीप मगर आदींच्या सह्या आहेत.
Photo AI