प्रिन्स इंग्लिश स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

प्रिन्स इंग्लिश स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

विद्यार्थ्यांनी वाढवला शाळेचा मानप्रिन्स इंग्लिश स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : येथील एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करून शाळेच्या गुणवत्तेची आणि शिक्षणपद्धतीची उज्ज्वल झलक दाखवली आहे. पाचवी व आठवी इयत्तेतील अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण प्राप्त करत शाळेचे नाव उंचावले आहे. पाचवी इयत्तेतील तिन्ही क्रमांक प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवले आहेत. प्रेरणा बाबासाहेब कष्टे हीने २७६ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. उन्नती विजयकुमार राठी हीने २६८ गुणांसह द्वितीय, तर प्रज्वल प्रमोद रोडगे याने २५६ गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे. या विद्यार्थ्यांच्या अथक मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याशिवाय इतर उच्च गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिवराज सूर्यवंशी (२१८ गुण), ब्रह्मास्मि शिंदे (२०२ गुण), आरुष धावळे व आशिष झोडगे (१८८ गुण), दुर्वा नंद (१८६ गुण), शिवप्रिया बोराडे (१८४ गुण), अविनाश घुमरे (१७६ गुण), अक्षरा भाबट व ऋषभ बोकण (१७४ गुण) तसेच अद्वैत लेंगुळे व आरुष कांबळे (१७० गुण) यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेचा अभिमान वाढवला आहे.

आठवी इयत्तेमध्येही प्रिन्स इंग्लिश स्कूलचे यश

आठवी इयत्तेत सानवी मारेवार व वरद कुटे यांनी २४२ गुण मिळवत संयुक्त प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर कृष्णा काकडे याने २२६ गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. आठवीच्या इतर उल्लेखनीय गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कार्तिक अबुज (२१८ गुण), हर्षल जाधव (२१४ गुण), पियुष राठोड (२१० गुण), तनिष्का पुण्डकर (२०८ गुण), स्नेहा कवळे (१८८ गुण), मयंक पुरी व स्वप्निल गंगे (१७८ गुण), संध्या तायनाक (१७६ गुण) व तेजस खापरखुंटीकर (१७६ गुण) यांचा समावेश आहे.

संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे विशेष अभिनंदन करताना सांगितले, “या यशामुळे आमच्या शाळेवरील पालकांचा विश्वास दुणावला आहे. भविष्यात अजून मोठे यश मिळवण्यासाठी आम्ही नवे उपक्रम राबवणार आहोत.विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनासाठी शिक्षकांनी सतत प्रयत्न केले. शाळेचा ‘विद्यार्थी केंद्रित’ दृष्टिकोन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धती यामुळेच हे अभूतपूर्व यश मिळवता आले आहे.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!