कोल्हावाडीचे डॉ.राम भिसे यांचा थायलंडमध्ये आंतरराष्ट्रीय सन्मान

कोल्हावाडीचे डॉ.राम भिसे यांचा थायलंडमध्ये आंतरराष्ट्रीय सन्मान

सकाश न्यूज नेटवर्क, परभणी : परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील कोल्हावाडी गावचे सुपुत्र डॉ. रामकिशन बाबुराव भिसे यांनी जागतिक स्तरावर पराक्रम गाजवला आहे. नवी मुंबईतील नेरुळ येथील SIES ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी येथे कम्युनिकेशन स्किल्सचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. भिसे यांना थायलंडमधील प्रतिष्ठित ISTAR इंटरनॅशनल ल्युमिनरी अवॉर्ड २०२५ प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार इंटरनॅशनल सोसायटी ऑफ टीचर्स, अ‍ॅडमिनिस्ट्रेटर अँड रिसर्चर्स (ISTAR) थायलंडतर्फे आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रदान करण्यात आला. २२ एप्रिल २०२५ रोजी समुत प्राकान येथील हुआच्यू चालेरमप्राकिएट विद्यापीठात पार पडलेल्या सोहळ्यात डॉ. भिसे यांचा गौरव करण्यात आला. डॉ. भिसे यांना शैक्षणिक नेतृत्व, डिजिटल अध्यापनशास्त्र आणि आंतरविद्याशाखीय नवोपक्रम यामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला. परिषदेत त्यांनी “The Impact of Artificial Intelligence on Transnational Education: A Critical Review” या विषयावर आपला शोधनिबंधही सादर केला.

डॉ. भिसे हे गेली १५.५ वर्षे पदव्युत्तर शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी ११ पुस्तके लिहिली आहेत, २० शोधनिबंध प्रकाशित केले आहेत आणि ३६ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपली मते मांडली आहेत. ते इंग्रजी भाषा शिक्षक संघटनेचे (ELTAI) राष्ट्रीय संयुक्त सचिव म्हणूनही कार्यरत आहेत. SIES ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्राचार्य डॉ. लक्ष्मीसुधा यांनी, तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी व हितचिंतकांनी डॉ. भिसे यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशाचा गौरव केला आहे. कोल्हावाडी आणि परभणी जिल्ह्यासाठी डॉ. भिसे यांचा हा सन्मान अभिमानास्पद ठरला आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!