विरेगावच्या जिल्हा परिषद शाळेत विविध कार्यक्रम
रांजणी : येथून जवळच असलेल्या विरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये २६ एप्रिलरोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी आठवीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला. विज्ञान प्रयोग शाळेचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास मस्के होते. यावेळी सरपंच सुरेश जाधव, गटशिक्षणाधिकारी भरत वानखडे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी भगवान मोठे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयकुमार खुळे, बाबुराव पवार, गणेश शिंदे, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष साळवे, पंडित चव्हाण, गणेश खरात, चितळी पुतळी केंद्रातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी श्रीकांत बागल, गणेश काळे, मयुरा वाकडीकर, प्रतीक्षा डहाळे, विनया गायकवाड, कांचन खरात आदींनी विशेष परिश्रम घेतले होते.