सद्भावना पदयात्रेत सेलू तालुका कॉंग्रेस ताकदीने सहभागी होणार : हेमंतराव आडळकर

सद्भावना पदयात्रेत सेलू तालुका कॉंग्रेस ताकदीने सहभागी होणार : हेमंतराव आडळकर

सेलू तालुका व शहर काँग्रेस कमिटी नियोजन बैठक उत्साहात

सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : काँग्रेस पक्षाच्या वतीने परभणी जिल्ह्यात नृसिंह पोखर्णी ते परभणी पर्यंत ४ आणि ५ मेरोजी सद्भावना पदयात्राआयोजित करण्यात येणार आहे. या पदयात्रेत सेलू तालुका ताकदीने सहभागी होणार आहे. अशी माहिती तालुकाध्यक्ष तथा साईबाबा बॅंकेचे अध्यक्ष  हेमंतराव आडळकर यांनी दिली आहे.

‘सद्भावना पदयात्रा’ यशस्वीपणे आयोजनासाठी सेलू तालुका काँग्रेसची नियोजन बैठक सोमवारी घेण्यात आली. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष हेमंतराव आडळकर होते. पदयात्रा समन्वयक तथा प्रवक्ते सुहास पंडित, युवक अध्यक्ष अमोल जाधव, माजी नगरध्यक्ष पवन अडळकर, युवक प्रदेश सरचिटणीस वैजनाथ देवकते, सुमित देशमुख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी बोलताना श्री.आडळकर म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या सद्भावना पदयात्रा कार्यक्रमात सेलू तालुक्यातील कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय सहभाग देणार व ताकदीने सहभागी होणार आहेत. या पदयात्रेव्दारे सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट दर्शवावी,असे आवाहन केले. सुहास पंडित यांनी सांगितले की, पदयात्रा केवळ राजकीय नसून, समाजाच्या सर्व घटकांना एकत्र आणण्याचा उपक्रम आहे. काँग्रेसच्या मूलभूत तत्त्वांनुसार, सर्वांना न्याय आणि विकासाची हमी देण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. पदयात्रा जिल्हाध्यक्ष सुरेशराव वरपुडकर यांच्या नियोजनाखाली होणार आहे, असे सांगितले.

युवक अध्यक्ष अमोल जाधव म्हणाले की, तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचून, लोकांच्या समस्यांचे निराकरण करणे आमचे ध्येय आहे. तसेच या पदयात्रेद्वारे समाजातील एकता, सहिष्णुता आणि प्रगतीचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल. या पदयात्रेच्या बैठकीत पुढील कार्यक्रमांची रूपरेषा ठरवण्यात आली असून, पक्षाच्या सामाजिक न्याय आणि विकासाच्या भूमिकेबाबत चर्चा झाली. प्रास्ताविक युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस इरफान जमीनदार यांनी तर आभार दिलावर शेख यांनी मानले. माजी नगरसेवक शेख रहीम, विनोद तरटे, मुस्ताक रब्बानी, चंद्रशेकर मुळावेकर, योगेश कुलकर्णी, फरहान रब्बानी, इम्तियाज अली खान, इमरान शेख, आतिक कुरेशी यांच्यासह काँग्रेस, जवान अभियानाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि समविचारी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!