शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन कन्या प्रशालेचे घवघवीत यश
सेलू : येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या इयत्ता आठवीच्या ११ आणि इयत्ता पाचवीच्या २ विद्यार्थिनी शिष्यवृत्ती पात्र ठरल्या आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, सीताराम मंत्री, नंदकिशोर बाहेती, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, एन.डी.पाटील, पी.टी.कपाटे, विभाग प्रमुख वैशाली चव्हाण, डी.बी.घोगरे आदींसह विविध स्तरांतून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थिनींची नावे अशी : इयत्ता आठवी : इंगोले अनन्या भारत (164), कोल्हे अनुष्का सचिन (168), वाढेकर आराध्या अनंतराव (160), खरात दिपाली अशोक (146), धानोरकर ईश्वरी नरेंद्र (164), गायकवाड कृतिका कृष्णा (152), सातपुते मानवी नितेश (174), मोरे नंदिनी दीपक (144), काकडे पूर्वा आसाराम (172), कुलकर्णी सई श्रीकांत (168), पवार सिद्धी श्याम (214) इयत्ता पाचवी : शेडूते पुनम अंबादास (188), इरमले प्रांजल श्रीकृष्ण (134)