सेलू येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

सेलू येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

नामफलकाचे अनावरण, शिवा संघटनेचा पुढाकार

सेलू : येथील अखिल भारतीय विरशैव शिवा संघटनेच्या मुढाकाराने जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची ८९४ वी जयंती बुधवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी शिवा संघटनेचे उपजिल्हाप्रमुख शिवकुमार नावाडे, प्रमुख पाहुणे म्हणून रामदासआप्पा पाटील, जनार्धन पाचलेगावकर यांची उपस्थिती होती. प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवराच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर शिवा संघटनेचे मार्गदर्शक गुरुबसप्पा पंचगल्ले यांचे शुभ हस्ते महात्मा बसेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली. या पूजेचे पौराहित्य कैलास मिटकर स्वामी यांनी केले. प्रास्ताविक कैलासअप्पा मलवडे, तर सुभाष मोहकरे यांनी महात्मा बसवेश्वरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. शिवा संघटनेचे तालुकाप्रमुख निजलिंगआप्पा तरवडगे, प्रदिप डफूरे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज कांदळे यांनी, तर सुजित मिटकरी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवा संघटनेचे नवनाथ सोनटक्के ,बबन अप्पा झमकडे ,सुनील नवघरे ,देवराव चौरे गणेश केसरखाणे ,प्रथमेश भगत ,सुधाकर गबाळे ,प्रकाश कोलीपाका यांनी परिश्रम घेतले.

सकाळी ८:३० वाजता शिवा संघटनेच्या वतीने येथील नूतन महाविद्यालया जवळील चौकात महत्मा बसवेश्वरांच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या वेळी प्रकाश साखरे, प्रथमेश भगत, गणेश केशरखाने, दिगंबर मोरे, देवराव चौरे, सुनील नवघरे, दगडय्या स्वामी, नंदकुमार आष्टीकर, प्रदीप डफुरे, प्रकाश कोलीपाका, मनोहर आप्पा चलोदे , रामेश्वर पाचलेगाककर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!