रांजणी येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
घनसांवगी : तालुक्यातील रांजणी येथील शिवतीर्थ येथे बुधवारी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या जीवनावर माहिती सांगण्यात आली. यावेळी सर्व श्री प्रल्हाद कावरे , विजयकुमार खुळे ,गोपाळराव देशमुख ,बंडेराव देशमुख ,दत्ता वरखडे ,शरद वरखडे , प्रल्हाद वरखडे , रमण जाधव , अशोक पाटोळे ,ज्ञानेश्वर सांगोळे ,भगवान हाडे, अशोक लगामे ,दत्ता तांगडे , अशोक कावरे , कुहिरे मामा, अशोक कावरे ,आदिसह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.