वासंतिक संगीत शिबिराचा समारोप
सेलूतील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा उपक्रम
सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने नूतन विद्यालयाच्या आयोजित २५ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान आयोजित वासंतिक संगीत शिबिराचा समारोप उत्साहात झाला. याप्रसंगी पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन शिबिरार्थींचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण लोया होते. प्रमुख पाहुणे रवी कुलकर्णी, प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर यांची उपस्थिती होती. नूतन विद्यालयाच्या कै.रा.ब.गिल्डा सभागृहात हे शिबिर घेण्यात आले. शिबिरात विद्यार्थ्यांना सूरसाधना, विविध गीत प्रकारचे गायन, वाद्य परिचय व विविध संगीततज्ज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केले. शिबिरात एकूण ८५ विद्यार्थी सहभागी झाले होते. मुख्य संयोजक सच्चिदानंद डाखोरे, पूजा महाजन यांच्यासह विविध गीत प्रकारांचे प्रशिक्षण दिले. संयोजक म्हणून उल्हास पांडे, सुषमा दामा, सोनाली कुबरे, सीमा सुक्ते, प्रणिता सोलापुरे, उमेश क्षीरसागर, अश्विनी पटाईत, आदिती आंबेकर तसेच फुलसिंग गावित, राहुल रोकडे, अरुण रामपूरकर, केशव डहाळे यांचे सहकार्य लाभले.