मुख्यमंत्री माझी, शाळा सुंदर शाळा : प्रिन्स इंग्लिश स्कूलचा महाराष्ट्र दिनी गौरव
सेलू तालुक्यातून प्रथम, तर जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार प्रदान
सेलू : महाराष्ट्र दिनानिमित्त शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य आणि पंचायत समिती सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर स्पर्धेतील विजेत्या शाळांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यात एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक (२०२३-२४) आणि जिल्हास्तरीय द्वितीय पारितोषिक (२०२४-२५) मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच, शाळेतील मागील वर्षीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी तनिष्का तेलभरे आणि क्षितिजा खजिने यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अमितकुमार मुंडे (बीडीओ, सेलू), गजानन वाघमारे (उपशिक्षण अधिकारी, परभणी), उमेशकुमार राऊत (गटशिक्षणाधिकारी, सेलू), अमोल निकम (तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षक संघ, सेलू), केंद्रप्रमुख विजय चिकटे , जनार्धन कदम (नोडल अधिकारी, सेलू) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, आणि प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे यांनी शाळेचे प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर आणि सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. हा सोहळा शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आणि विद्यार्थ्यांच्या यशाचा उत्सव ठरला.