ज्ञानसाधना प्नतिष्ठानने राखली शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा

ज्ञानसाधना प्नतिष्ठानने राखली शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा

परभणी : इयत्ता बारावीच्या परीक्षेत धर्मापुरीपाटी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचालित रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालय व ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूलच्या कला व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी निकाल शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे.

संस्थेचे अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, सचिव प्रा.शितल सोनटक्के, एम.एस.शर्मा, जे.टी.निकम, पी.व्ही.कदम, विभाग प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. रायरेश्वर विद्यालयात विज्ञान शाखेमध्ये संस्कृती चाफे हीने ८६ टक्के गुण घेऊन प्रथम, व्दितीय ईशान वर्मा ८४ टक्के, तर प्रेम वानखेडे ८३ टक्के याने तृतीय क्रमांक मिळविला आहे. कला शाखेमध्ये गुणानुक्रमे पहिल्या तीन विद्यार्थ्यांत आरती मस्के ८६ टक्के, आरती बोंबले ७९ टक्के, श्रद्धा गायकवाड ७८ टक्के यांचा समावेश आहे. २० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले आहे. ज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेत मनीषा पारधे हीने ९३ टक्के गुण घेऊन प्रथम, व्दितीय वैष्णवी बरबडे ८९ टक्के, तृतीय ऋतुजा नलवले ८३ टक्के यांनी यश संपादन केले आहे. कला शाखेत संध्या कदम ८३ टक्के, कविता बोंबले ७८ टक्के, अंकिता जुंबडे ७६ यांनी यश मिळविले आहे. विशेष प्राविण्यासह १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान शाखेमध्ये दिपाली रसाळ ७४ टक्के, रूपाली रसाळ ७१ टक्के, वैष्णवी रसाळ ७० टक्के यांनी घवघवीत यश मिळविले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!