नूतन महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांचे घवघवीत यश 

नूतन महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांचे घवघवीत यश 

सेलू : इयत्ता बारावीच्या परीक्षेत येथील नूतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. निकालाची उज्ज्वल परंपरा राखली. निकाल ९२ टक्के लागला असून ६१९ पैकी ५७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्यात ४१, प्रथमश्रेणीत १६२ जण आले.विज्ञान शाखेचा ९९.८४, वाणीज्य शाखेचा ९२.४२, कला शाखेचा ८८.२८ तर एमसीव्हीसी शाखेचा ७८.५७ टक्के निकाल लागला आहे. याबद्दल डॉ. एस.एम. लोया, डॉ. विनायकराव कोठेकर, जयप्रकाश बिहाणी, प्राचार्य डॉ. उत्तम राठोड, डॉ. शरद कुलकर्णी, पि.एस. सोनवणे आदींनी सत्कार केला.

विज्ञान शाखेत गुणानुक्रमे पहिले तीन विद्यार्थी : एकता कुंदनानी ८९.३३, ईरा खापरखुंटीकर ८८.५०, सृष्टी हुगे ८६.१७ वाणिज्य शाखा : मेघा देशमुख ८९.५०, आकांक्षा कटारे ८८.१७, अर्थव साळेगावकर ८७.८३, कला शाखा : तृप्ती शहाणे ८९.६७, प्रिया राऊत ७९.८३, रितेश शर्मा ७९.५०

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!