डॉ.संजय रोडगे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा
१४ मेरोजी इंदोरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन
सेलू : सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजयजी रोडगे यांचा अभिष्टचिंतन सोहळा ७ मेरोजी उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव डॉ.सविता रोडगे, अध्यक्ष आदरणीय डॉ.रामराव रोडगे, डॉ गणेश पारवे, डॉ.अपूर्वा पारवे-रोडगे, अशोक पटवारी, प्रफुल्ल बिनायके आदींची उपस्थिती होती.
वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. त्याचबरोबर घटक संस्थेतील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापकव शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने डॉ.रोडगे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.मीनाक्षी रत्नपारखी यांनी केले. यावेळी अशोक बोडखे व अशोक पटवारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिगाबर टाके व कल्पना भाबट यांनी केले तर आभार श्री.आकात यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी घटक संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, वाढदिवसानिमित्त १४ मेरोजी सायंकाळी सहा वाजता निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.