SSC Exam Results 2025 : उत्सुकता संपली; उद्या दहावीचा निकाल

SSC Exam Results 2025 : उत्सुकता संपली; उद्या दहावीचा निकाल

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने उद्या (१३ मे) दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर १० दिवसांच्या आत निकाल लागेल, असे म्हटले होते. त्यामुळे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेर बोर्डाकडून दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यंदा राज्यातून १६ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. राज्यातील २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती.

बोर्डाची पत्रकार परिषद मंगळवारी सकाळी अकरा वाजता होणार आहे. त्यानंतर ऑनलाइन निकाल मंगळवारी, १३ मे रोजी दुपारी एक वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर जारी होतील. बोर्डाकडून पत्रकार परिषदेत राज्याचा निकाल, मुलींचे आणि मुलांचे उत्तीर्ण प्रमाण, जिल्हानिहाय उत्तीर्ण आकडेवारी सांगितली जाईल.

खालील वेबसाइट्सवर दहावीचा निकाल ऑनलाइन पाहता येईल.

mahahsscboard.in

-mahresult.nic.in

msbshse.co.in

mh-ssc.ac.in

sscboardpune.in

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!