मंडाला आर्ट कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : येथील मुक्तांगण आर्टच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी शांतता व एकाग्रता वाढावी यासाठी एक दिवसीय मोफत मंडला आर्ट वर्कशॉपचे आयोजन रविवारी, ११ मे रोजी करण्यात आले होते.
ध्यान धारणा व प्रार्थनेसाठी मंडला आर्ट उपयोगी ठरते. मंडल या संस्कृत शब्दाचा अर्थ वलय किंवा वर्तुळ होतो. सममिती आकार रेखाटताना एकाग्रता वाढते. हिंदू आणि बौद्ध धर्मात मंडला आर्ट चा उपयोग धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात होतो. मंडलामुळे कलात्मकता वाढते. आदी मार्गदर्शन कलाशिक्षक पांडुरंग पाटणकर यांनी केले.
यावेळी पाटणकर यांनी बेसिक आकार त्याचबरोबर वर्तुळाकारातील मंडला आर्टचे प्रात्यक्षिक दिले. तल्लीन होऊन बालकांनी कृतिशील सहभाग नोंदवला. गौरव निलेश पाटील याने कार्यशाळेविषयी मनोगत व्यक्त केले. तर आभार रुद्र खरात याने मानले. सेलू शहरातील श्री के.बा.विद्यालय, नूतन विद्यालय, नूतन कन्या प्रशाला, न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, ज्ञानतीर्थ विद्यालय, प्रिन्स इंग्लिश स्कूल, विवेकानंद प्राथमिक विद्यालय आदी शाळांमधील ५० विद्यार्थ्यांनी वर्कशॉपचा लाभ घेतला. यावेळी उपस्थित बालिकांना संचालिका भाग्यश्री पाटणकर यांच्या खाऊ वाटप करण्यात आला. कार्यशाळा यशस्वीतेसाठी श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय धारासुरकर, बालाजी हाळणे, सिद्धार्थ एडके सहशिक्षक धीरज दुधगोंडे, ज्ञानेश्वर परांडे, मुक्तांगणच्या संचालिका भाग्यश्री पाटणकर यांचे सहकार्य लाभले.