उन्हाळी टेबल टेनिस प्रशिक्षण शिबिराला सुरूवात
सकाश न्यूज नेटवर्क, परभणी : येथील बी.रघुनाथ महाविद्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि चेतननंद टेबल टेनिस क्लब यांच्यावतीने १० ते १८ मे कालावधीत मोफत उन्हाळी टेबल टेनिस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिराचे उद्घाटन गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ओमप्रकाश डागा यांच्या हस्ते झाले.
या शिबिरात ४५ खेळाडूंनी सहभागी झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक सोनी, सतीश झरकर, टेबल टेनिस संघटनेचे कोषाध्यक्ष प्रा.डॉ.माधव शेजुळ, प्राचार्य डॉ.विलास सोनवणे प्रशिक्षक चेतन मुक्तावर प्रा.डॉ.विनोद गणाचार्य हे उपस्थित होते. यावेळी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू आद्या बाहेती हिचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन बी.रघुनाथ महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.विनोद गणाचार्य यांनी केले व आभार चेतन मुक्तावार यांनी मानले. परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, टेबल टेनिस असोसिएशन गणेश माळवे आदींची उपस्थिती होती.