तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम
सेलू : तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५८७ व्या जयंतीच्या निमित्ताने गायत्रीनगर येथील पंचशील बुद्ध विहारात सोमवारी, १२ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी परभणी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मिलिंद सावंत, सेलूचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रभाकर कवाळे, ॲड हर्षवर्धन सोनकांबळे, ॲड सुनील डंबाळे, ॲड.अक्षय प्रधान, साळवे गुरुजी, गंगाधर खेबाळे गुरुजी, गायकवाड, तात्या साळवे आदी उपस्थित होतो. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ शिरसाट, विजय खेबाळे, आनंद साळवे, अक्षय साळवे, लताताई नाटभजे यांनी परिश्रम घेतले. या वेळी सिद्धार्थ नवयुवक मंडळाच्या वतीने खिरदान करण्यात आले.