हज़रत सय्यद शाहबुद्दिन यांचा उरूस बुधवारपासून
सेलूमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : सेलू शहरातील कामिल अवलिया दर्गाह हज़रत सय्यद शाहबुद्दिन व हज़रत सय्यद बुरहानुद्दिन यांच्या उरसाची सुरूवात बुधवारपासून (१४ मे) होत आहे. १४ मे रोजी बाद नमाज असर, शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत दर्गेला गुसल स्नान करण्यात येणार आहे.
गुरुवारी १५ मेरोजी दुपारी तीन वाजता दर्गेपासून उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांच्या हस्ते चादर चढवून संदल निघणार आहे. या वेळी तहसीलदार डॉ.शिवाजी मगर, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांची उपस्थिती राहणार आहे. शुक्रवारी, १६ मे रोजी रात्री नऊ वाजता शानदार कवालीचा कार्यक्रम होणार आहे. तर शनिवारी, १७ मे रोजी फजर नमाझनंतर सकाळी सहा वाजता तबरूख तक्सिम गोडजेवणचा कार्यक्रम होणार आहे. उर्सानिमित्त होणाऱ्या सर्व कार्यक्रमाचा सेलू शहरातील सर्व समाज बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दर्गा मुतवल्ली सय्यद कबीर सय्यद अमीर, दर्गाह कामटीचे अध्यक्ष उरुज अली खान, एकबाल सेठ मोदी, अबरार बेग, नासर खान, अशफाक बकाली, नुरा सेठ कच्छी, सय्यद खदिर, मिया भाई, शेख गफार झारेकरी, सय्यद झुबेर, शेख समीर यांच्यावतीने करण्यात आले आहे.