राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सेलूत विविध कार्यक्रमांचे आयोजन
सेलू : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त सेलू येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, त्याबाबतची नियोजन बैठक शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. या बैठकीत विविध संघटनांचे पदाधिकारी, समाजबांधव आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीचे अध्यक्षस्थानी अशोक अंभोरे हे होते. या जयंती उत्सवाचे संयोजक सरपंच भागवत दळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यामध्ये एकमताने १ जून रोजी सेलू येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नियोजन बैठकीला समाजातील व हिंदू संघटनांतील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये सरपंच सुदामराव रोकडे, रामजी गायकवाड, उपसरपंच माऊली, चौरे त्रिंबक पितळे, ऋषी झमकडे, गणेश ढेंगळे, अभि शिंदे, गोविंदराव शिंदे, रामजी गडदे, श्रीराम मोगरे, भागवत मोगरे, अनिल दळवे, विठ्ठल मोगरे, तुकाराम महाजन, किशनराव बादाड, परमेश्वर वारकड, अशोक गिनगीने, रघुनाथ कालदाते, सतीश कोरडे, संतोष पाडुळे अशोक कारके, एकनाथ कारके, ओंकार डोईफोडे, भगवान चालक यांचा समावेश होता.
बैठकीत कार्यक्रमाच्या स्वरूपाविषयी, आयोजनाच्या जबाबदाऱ्या, आमंत्रणपत्रिकांचे वाटप, सांस्कृतिक कार्यक्रम, वक्ते आणि प्रमुख पाहुण्यांची निवड यावर सविस्तर चर्चा झाली. राजमातेचे जीवनकार्य आणि राष्ट्रसेवेतील त्यांचे योगदान युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करणे, यावरही भर देण्यात आला. कार्यक्रम भव्य दिव्य आणि सुसंगठित व्हावा यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची ग्वाही दिली. हा जयंती सोहळा सामाजिक ऐक्य, संस्कृती आणि राजमातेच्या आदर्शांचे स्मरण करणारा महत्त्वपूर्ण कार्यक्रम ठरणार आहे.