ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूलने राखली १०० टक्के निकालाची परंपरा
परभणी : धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचालित ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूलने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत एस.एस.सी बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयातून सर्वप्रथम- भक्ती अच्युतराव गेरकर-93.00%, द्वितीय- भिसाड सुरज उमेश -92.00%, तृतीय -अंभोरे ऋतुजा अच्युतराव -91.00% यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. एकूण निकालामध्ये 90% पेक्षा जास्त गुण घेणारे पाच विद्यार्थी, विशेष प्राविण्यासह-39 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत-21 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विषय निहाय निकालामध्ये मराठी-94, हिंदी-96 इंग्रजी-94, गणित- 91, विज्ञान- 84, सामाजिक शास्त्र 93 गुण घेऊन प्रथम क्रमांक आले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, सचिव प्रा.शितल सोनटक्के, समन्वयक, सर्व विभाग प्रमुख ,शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.