ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या रायरेश्वर विद्यालयाचा १०० टक्के निकाल

ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या रायरेश्वर विद्यालयाचा १०० टक्के निकाल

परभणी : धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचालित रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूण प्रविष्ट २३० विद्यार्थीही उत्तीर्ण झाले असून ५४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेऊन विशेष प्रावीण्य मिळविले आहे. तर १८० विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
शाळेतून प्रथम श्वेता प्रदीप खवले ९९ टक्के , द्वितीय शितल भारत गायकवाड ९८, चैतन्य उमाकांत जोशी (९८), श्रुती अच्युतराव गरुड यांना ९७.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, सचिव प्राचार्या शितल सोनटक्के, समन्वयक आर.जी.पोले, विभाग प्रमुख श्री. चिंचाने, श्री.कुलकर्णी, परीक्षा प्रमुख श्री.परडे, लोहट, श्री. चव्हाण, श्री. शेख मूरसलीम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन के

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!