यासेर उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश
सेलू : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2025 च्या परीक्षेत गौरव सेवाभावी संस्था संचलित यासेर उर्दू हायस्कूल सेलू या शाळेने यशाची परंपरा कायम राखीत घवघवीत यश प्राप्त केले. शाळेचा निकाल 94.11 टक्के असा लागला आहे. शाळेतून प्रथम क्रमांक शेख जाेया समिन सुहेब 86.20 टक्के, द्वितीय सय्यद माहीन सदफ दिलदार 81.20 टक्के, तर
तृतीय क्रमांक शेख फायजा सिकंदर 78.00 टक्के मिळविला आहे. पठाण जोया अजमतखान 77.80 टक्के, कुरैशी अर्शिया अनम माेहम्मद रफिक 75.40 टक्के, शेख मोहम्मद गुफरान मोहम्मद मुनिर 71.00 टक्के, शेख अफीफा सालेहीन अफसर 64.00 टक्के, शेख जास्मीन फिरदाेस मुजाहिद 60.00 टक्के गुण संपादन केले आहेत. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पठाण रहीम खान खैरुल्लाखान तसेच मुख्याध्यापिका कासमी तहेसीन सुलताना शमीम अहेमद व प्राथमिकचे मुख्याध्यापक पठाण जावेद खान, शिक्षक सय्यद खिजर, सिद्दिकी फजल , फहेमिदा , जहीर , गडदे , काैसर मॅडम, असलम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.