दहावीचा निकाल : सेलूच्या नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची बाजी
स्वराज जाधवला शंभर टक्के गुणांच्या राज्ययादीत स्थान
शाळेचा निकाल ८७.८२ टक्के, तब्बल ११५ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत
सकाश न्यूज नेटवर्क. सेलू : मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यालयाने निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली असून, शाळेच्या स्वराज लक्ष्मण जाधव याने १०० टक्के गुण घेऊन राज्यस्तरावरील शंभर टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रावीण्य श्रेणीत ११५, तर २८ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण विशेष प्रावीण्य मिळविले आहे. संस्कृत विषयात ६, तर विज्ञान विषयात एका विद्यार्थ्यांने १०० टक्के गुण मिळवून शाळेच्या लौकिकात भर घातली आहे.
दहावीचा निकाल मंगळवारी, १३ मे रोजी जाहीर झाला. सेलू तालुक्यातून दहावीच्या परीक्षेला नूतन विद्यालयाचे सर्वाधिक एकूण ५०१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४४० विद्यार्थी (८७.८२ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये पास श्रेणीत ६९, द्वितीय १२९, प्रथम १२७, तर प्रावीण्य श्रेणीत तब्बल ११५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २८ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन विशेष प्रावीण्य मिळविले आहे.
गुणानुक्रमे पहिल्या पाच विद्यार्थ्यांत सर्वप्रथम – स्वराज लक्ष्मण जाधव १०० टक्के, द्वितीय- स्वरा रविंद्र लाटकर ९९.६० टक्के, तृतीय- सय्यद कय्युम करीम ९७.६० टक्के, पद्मेश अभय सुभेदार ९७.६० टक्के, चौथा- सिद्धांत शेषराव नागरे ९७.००, पाचवी- विभुती विजयकुमार जामदार ९५.८० टक्के यांचा समावेश आहे. संस्कृत विषयात विभुती जामदार, रितेश लहाने, स्वरा लाटकर, सय्यद कय्युम, हर्ष पिंगळे, अविनाश वाघ या विद्यार्थ्यांनी १०० गुण, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयात स्वराज जाधव याने १०० गुण मिळवले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष सीताराम मंत्री, नंदकिशोर बाहेती, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे, आर.एस.मोगल, शंकर बोधनापोड, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले आहे.
२८ विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य
९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेऊन २८ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले आहे. यामध्ये स्वराज जाधव १०० टक्के, स्वरा लाटकर ९९.६०, सय्यद कय्युम ९७.२०, पद्मेश सुभेदार ९७.२०, सिद्धांत नागरे ९७, विभूती जामदार ९५.८०, हनुमान खेडेकर ९५.८०, निलेश झोल ९५.६०, राजनंदिनी निकम ९५.४०, वैष्णवी पिंपळगावकर ९५.४०, पियुष मुनेश्वर ९५.२०, श्लोक कुलकर्णी ९५, रितेश लहाने ९४.६०, यज्ञेश्वर टोम्पे ९४.६०, विवेक गव्हाणे ९४, धीरज पठारे ९३.६०, आदित्य बुधवंत ९३.२०, हर्ष पिंगळे ९३.२०, दत्तात्रेय भुजबळ ९२.४०, महेश भाबट ९१.८०, व्यंकटेश खोडके ९१.६०, नागनाथ कटारे ९१.४०, शिवम तळेकर ९१.२०, सृष्टी सोलापूरे ९१.२०, अविनाश वाघ ९०.८०, प्रथमेश बोराडे ९०.६०, दुर्गेश भाले ९०.२०, श्रेया मुजमुले ९० टक्के यांचा समावेश आहे.