SSC Exam Results 2025 : छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल 92.82 टक्के
बीड जिल्ह्याची निकालात आघाडी
परभणी : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा मंगळवारी (दि.13) मंडळाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला असून विभागाचा एकूण निकाल 92.82 टक्के एवढा लागला आहे. या निकालात बीड जिल्ह्याचा सर्वाधिक 96.47 टक्के तर हिंगोली जिल्ह्याचा सर्वात कमी म्हणजे 89.07 टक्के एवढा निकाल लागला आहे. छत्रपती संभाजीनगरचा 93.60 टक्के, परभणीचा 89.24 टक्के, जालन्याचा 91.44 टक्के एवढा निकाल जाहीर झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात इयत्ता दहावीकरीता 1 लाख 85 हजार 407 विद्यार्थी नोंदविल्या गेले होते. त्यापैकी 1 लाख 83 हजार 957 विद्यार्थी परिक्षेत प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 1 लाख 70 हजार 750 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकालाची टक्केवारी 92.82 टक्के एवढी आली आहे.
छत्रपती संभाजीनगरातून 66 हजार 982 विद्यार्थी नोंदविल्या गेले. त्यापैकी 66 हजार 626 परिक्षेत प्रविष्ट होते. त्यापैकी 62 हजार 366 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची एकूण 93.60 टक्के एवढी टक्केवारी आली आहे. बीड जिल्ह्यातून 41 हजार 958 विद्यार्थी नोंदविल्या गेले होते. त्यापैकी 41 हजार 541 परिक्षेत प्रविष्ट झाले. तर 40 हजार 077 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बीड जिल्ह्याची निकालाची टक्केवारी 96.47 टक्के एवढी आहे. परभणी जिल्ह्यातून 28 हजार 899 विद्यार्थी नोंदविल्या गेले होते. त्यापैकी 28 हजार 592 विद्यार्थी परिक्षेत प्रविष्ट झाले तर 25 हजार 516 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 89.24 टक्के एवढा जिल्ह्याचा निकाल आहे. जालना जिल्ह्यातून 31 हजार 775 विद्यार्थी नोंदविल्या गेले. त्यापैकी 31 हजार 585 विद्यार्थी परिक्षेत प्रविष्ट होते. 28 हजार 883 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याची टक्केवारी 91.44 टक्के एवढी आहे. हिंगोली जिल्ह्यातून 15 हजार 793 विद्यार्थी नोंदविल्या गेले. त्यापैकी 15 हजार 600 विद्यार्थी परिक्षेत प्रविष्ट होते. 13 हजार 908 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हिंगोली जिल्ह्याचा एकूण 89.07 टक्के एवढा निकाल लागला आहे. मंडळातून एकूण 1 लाख 85 हजार 407 विद्यार्थी नोंदविल्या गेले होते. त्यापैकी 1 लाख 83 हजार 957 विद्यार्थी परिक्षेत प्रविष्ट झाले. तर 1 लाख 70 हजार 750 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मंडळाचा एकूण 92.82 टक्के एवढा निकाल लागला आ