दहावीचा निकाल : वाढीव प्रावीण्य गुणांचा २,४६,६०२ पात्र विद्यार्थ्यांना लाभ
२११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण; ७,९२४ शाळांचा निकाल १०० टक्के
परभणी : दहावीच्या परीक्षेत कला, क्रीडा, एन.सी.सी. व स्काऊट गाईड क्षेत्रात सहभाग / प्राविण्य प्राप्त पात्र विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे वाढीव गुण देण्यात येतात. त्यानुसार यंदाच्या परीक्षेत एकूण २,४६,६०२ पात्र विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला, लोककला, चित्रकला, क्रीडा, एन.सी.सी. व स्काऊट गाईड यापैकी उच्चतम असणाऱ्या एकाच क्षेत्रासाठीचे सहभागाचे /प्राविण्याचे गुण देण्यात आलेले आहे
महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२५ च्या दहावी परीक्षेचा निकाल १३ मे रोजा जाहीर केला. यंदाच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. तर नागपूर विभाग तळाला राहिले आहे. नागपूर विभागाचा यंदाचा निकाल ९०.७८ टक्के लागला आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नियमित, खाजगी व पुनर्परिक्षार्थी मिळून एकूण १६,१०,९०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,९८,५५३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,८७,३९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.०४ आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या दहावी निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३१ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८३ ने जास्त आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ९,६७३ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,५८५ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी ८,८४४ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.२७ आहे.
विभागनिहाय दहावीचा निकाल असा :
१. कोकण – ९८.८२
२. कोल्हापूर -९६.८७
३. मुंबई – ९५.८४
४. पुणे -९४.८१
५. नाशिक – ९३.०४
६. अमरावती -९२.९५
७. छत्रपती संभाजीनगर -९२.८२
८. लातूर – ९२.७७
९. नागपूर – ९०.७८
२. कोल्हापूर -९६.८७
३. मुंबई – ९५.८४
४. पुणे -९४.८१
५. नाशिक – ९३.०४
६. अमरावती -९२.९५
७. छत्रपती संभाजीनगर -९२.८२
८. लातूर – ९२.७७
९. नागपूर – ९०.७८
विभागनिहाय १०० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी :
पुणे – १३, नागपूर – ३, छत्रपती संभाजीनगर – ४०, मुंबई -८, अमरावती -११, लातूर – ११३, कोकण – ९, एकूण – २११
७,९२४ शाळांचा निकाल १०० टक्के
राज्यातील २३,४८९ माध्यमिक शाळांतून १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,९२४ शाळांचा निकाल १०० % लागला आहे,” असे मंडळाने सांगितले