दहावीची परीक्षा : समृध्दी, मानसी, चैताली यांचा गौरव
नूतन कन्या प्रशालेचे घवघवीत यश
सेलू : येथील श्रीमती ल.ला.रा.नूतन कन्या प्रशालेची विद्यार्थिनी समृध्दी सदाशिव मुळी हीने दहावीच्या परीक्षेत ९९ टक्के प्राप्त केल्याबद्दल, तसेच मानसी विष्णूदास मोरेगावकर ९७.६०, काकडे चैताली दत्तात्रय ९७.६० टक्के यांचा प्रशालेच्या वतीने घरी जाऊन पालकांसह सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.