दर्गाह हजरत सय्यद शहाबोद्दिन ऊर्स उत्साहात 

दर्गाह हजरत सय्यद शहाबोद्दिन ऊर्स उत्साहात 

सेलू : सेलू शहरातील कामिल अवलिया हजरत सय्यद शहाबोद्दिन व हजरत सय्यद बुर्हानोद्दिन अवलीया यांच्या उरूस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

गुरूवारी, १५ मे रोजी दुपारी तीन वाजता दर्गा मुत्वल्ली सय्यद कबीर भाई नानू, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र लहाने, सेलू पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक बोरसे, हाजी अझीझ अली खान, हाजी अलिशेर खान, उरूज अली खान, असद लशकर्या यांच्या प्रमुख उपस्थितीत फुलांची चादर चढवून ढोल ताशांच्या गजरात संदल मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली.

मिरवणूक सेलू शहरातील क्रांती चौक, जैन मंदिर, राजमोहल्ला, तकीया मोहल्ला आठवडी बाजार या प्रमुख मार्गाहून होऊन परत दर्गेत पोहचून मिरवणुकीचा सांगता करण्यात आली. संदल मिरवणूकीत भाविक भक्त मोठ्यां संख्येने सहभागी झाले होते. अश्रफी नियाझ कमिटीच्या वतीने नियाझचे आयोजन करून दर्गेला चादर चढविण्यात आली.

रात्री नऊ वाजता अश्रफी नियाझ कमिटीच्या वतीने मास इंडिया न्यूज चॅनलचे संपादक असद भाई लशकरया आयोजित मुंबई येथील प्रसिद्ध कव्वाल कलीम नईम हाश्मी यांचा बहारदार कव्वालीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते. शनिवारी, १७ मे रोजी फजर नमाझनंतर सकाळी सहा वाजता तबरूख तक्सिम गोडजेवणचा कार्यक्रमाने सांगता झाली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!