विभागीय खुल्या टेबल टेनिस स्पर्धेचे परभणीत उद्घाटन 

विभागीय खुल्या टेबल टेनिस स्पर्धेचे परभणीत उद्घाटन

परभणी : येथील बी रघुनाथ महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या इंडोर हॉलमध्ये दोन दिवसीय (१७ व १८ मे)टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन डॉ.सुधांशु देशमुख व डॉ.दीपक गट्टी यांच्या हस्ते झाले.  या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून परभणीचे माजी टेबल टेनिस खेळाडू चेतन सुरवसे, उमेश देशमुख आणि विशाल मेहता तसेच छत्रपती संभाजी नगरचे बीडीओ उमेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी बी रघुनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास सोनवणे व क्रीडा विभागप्रमुख डॉ.विनोद गणाचार्य यांनी स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. ही स्पर्धा एकूण सात वयोगटांमध्ये होणार असून त्यात ११ वर्ष मुले,११ वर्ष मुली,१३ वर्षे मुले,१३वर्ष मुली,१५व १७ वर्षे मुली,१५ वर्षे मुले, १७ व १९ वर्षे मुले यांचा समावेश आहे.या विभागीय खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत नांदेड, छत्रपती संभाजीनगर,बीड आणि परभणी या चार जिल्ह्यातील १०० पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेसाठी विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सहकार्य लाभले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!