विनोद बोराडे मित्रमंडळातर्फे हज यात्रेकरूंचा सन्मान
सेलू : सेलू येथील विनोद बोराडे मित्रमंडळाच्या वतीने हज यात्रेस जाणाऱ्या यात्रेकरूंचा रविवारी, १८ मे रोजी यथोचित सन्मान करण्यात आला. या वेळी यात्रेकरू हकीम बागवान, मोहसीन खान,अर्शद खान, हनीफ इशानी, हकीम कादरी यांना कुराणातील आयतल खुर्सी व यासीन शरीफची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सेलू तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेशभाऊ बोराडे, माजी नगरअध्यक्ष विनोद बोराडे, प्रभाकर सुरवसे, राजेंद्र पवार, वहिद अन्सारी, साईराज बोराडे, गौतम धापसे, बालू सरकाळे, अरुण दौड आदी मान्यवर उपस्थित होते.