सेलूत तिरंगा रॅली उत्साहात

सेलूत तिरंगा रॅली उत्साहात

सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेसाठी भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला आणि बलिदानाला मानवंदना देण्यासाठी सोमवारी, १९ मेरोजी सेलू शहरात तिरंगा रॅली उत्साहात काढण्यात आली. तिरंगा झेंडा हाती घेत रॅलीत सहभागी नागरिक व विद्यार्थ्यांनी दिलेल्या भारत माता की जय, वंदे मातरम घोषणांनी परिसर दणाणून गेला. सर्वपक्षीय संघटना, सामाजिक संस्था व समस्त सेलूकरातर्फे सकाळी नऊ वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा स्मारकात माजी सैनिकांच्या हस्ते शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  गटकळ करिअर अकॅडमीचे विद्यार्थी, आजी-माजी सैनिक, त्यांचे पालक, कमांडो अकॅडमीचे विद्यार्थी, विविध शैक्षणिक, सामाजिक संस्था व पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तरूण, विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होत्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!