रामराव लाडाणे, मुळावेकर यांना पुरस्कार

रामराव लाडाणे, मुळावेकर यांना पुरस्कार

सेलू : भारत को ऑपरेटिव्ह बँक मुंबई व बीटुबी टीम यांच्या वतीने सेलू् येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर यांना बेस्ट डायरेक्टर ऑफ द ईयर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे यांना बेस्ट सीईओ ऑफ द ईयर पुरस्काराने सन्मानीत मुंबई येथील कार्यक्रमात २३ मे रोजी सन्मानित करण्यात आले आहे. सन्मेश जोशी, आशीष श्रीवासत्व, प्रभात चतुर्वेदी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी बॅकेचे जेष्ठ संचालक दत्तात्रय आंधळे उपस्थित होते. यापूर्वीच संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांना बेस्ट चेअरमन ऑफ द ईयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. बॅंकेच्या उत्कृष्ट कार्याची देशपातळीवर दखल घेतली जात आहे. याबद्दल बॅंकेचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!