महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन
सेलू : येथील जिंतूर नाका परिसरातील श्री महाराणा प्रतापसिंह चौक येथे 29 मे रोजी सकल राजपूत हिंदू समाज बांधवातर्फे हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जी यांच्या 485 व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. महाराणा प्रतापसिंह यांच्या जयघोषात आतषबाजी करण्यात आल. या वेळी नागेश ठाकूर, कृष्णा चव्हाण, इंद्रजीत ठाकूर, अर्जुन ठाकूर, आकाश चव्हाण, पवन ठाकूर, कृष्णा गायकवाड, अभि महाजन, शुभम कदम, जतीन काकडे, विशाल वाकळे, ओम गायकवाड, अभिषेक केशरखाने, विठ्ठल कलालडे आदी उपस्थित होते.