जावेद पठाण यांना सहारा फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
परभणी : राज्यातील गुणवंत आणि उपक्रमशील शिक्षकांना देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक एज्युकेशन आयकॉन पुरस्कार सेलू येथील गौरव सेवाभावी संस्था द्वारा संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जावेद खान फ़ेरोज़ खान पठाण यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालय सभागृहात सिनेअभिनेता अनिल मोरे, ॲड.पवन निकम, डॉ.अशोक जोंधळे, प्रा.अरुण पडघन आणि संस्थापक अध्यक्ष अजमत खान, प्रा. डॉ.मुनीब हनफी यांच्या उपस्थितीत पार पडला.
जावेद पठाण हे यासेर उर्दू प्राथमिक शाळेवर एक उपक्रमशील आणि तंत्रस्नेही मुख्याध्यापक म्हणून ओळखले जातात. विद्यार्थ्यांतील कला गुणांना वाव देऊन त्यांच्यात गुणवत्ता विकासाचे नेहमीच प्रयत्न करत असतात. त्यांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित केले आहे. याबद्दल पठाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे