फिरोजपूर एक्स्प्रेसचे सेलू स्थानकावर स्वागत
सेलू : उत्तर रेल्वेने नव्याने सुरू केलेल्या हुजूरसाहेब नांदेड-फिरोजपूरर कॅन्ट जंक्शन – हुजूरसाहेब नांदेड (गाडी संख्या १४६२१ व १४६२२) या साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वेचे सेलू स्थानकावर रविवारी, १५ जून रोजी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी सेलू प्रवासी संघाचे अध्यक्ष शिवनारायण मालाणी व सदस्यांनी रेल्वे चालक संजय दास, स्टेशन मास्टर अरविंदकुमार आर्या आणि गायकवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन आणि पेढे भरवून अभिनंदन केले. या वेळी मनीष कदम, रेल्वे बोर्ड सदस्य शिवाजी शिंदे कृष्णा काटे, भगवान पावडे, बबलू मंडलीक, शेख मुनीर, मोहन खापरखुंटीकर, विकी कुंदनानी, आनंद बाहेती, दिलीप डासाळकर, सच्चिदानंद डाखोरे, भरत रोडगे, प्रभाकर पावडे आणि सुभाष मोहकरे आदींची उपस्थिती होती.
ही गाडी हुजूर साहिब नांदेड येथून १५ जून रोजी रविवारपासून सकाळी ११.५० वाजता सुटेल आणि पूर्णा १२.२०, परभणी १२.५८, सेलू १.४६, जालना २.५८, औरंगाबाद १६.५० व पुढे मनमाड जं., भुसावळ जं., खांडवा, इटारसी जं., भोपाळ, विदिशा, बिना जं., विरांगना लक्ष्मीबाई झाशी, ग्वाल्हेर, आग्रा कँट, मथुरा जं., फरीदाबाद, दिल्ली-सफदर जंग, शकूरबस्ती, बहादुरगड, रोहतक, धमतन साहिब, जिंद, जाखल, मानसा, भटिंडा जंक्शन, कोट कपुरा जंक्शन, फरीदकोट, मार्गे फिरोजपूर कॅन्ट जंक्शन येथे मंगळवारी सकाळी ४.३० वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात फिरोजपूरहून शुक्रवारी दुपारी १.२५ वाजता निघालेली गाडी शनिवारी रात्री ९.०० वाजता औरंगाबाद, १० वाजता जालना, ११ वाजता सेलू व पुढे नांदेडला पोहोचेल. या साप्ताहिक गाडीत द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वातानाकुलीत, द्वितीय शय्या आणि जनरल असे २२ डब्बे असतील. या नवीन साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेसमुळे मराठवाड्यातील पर्यटक आणि भाविकांना हरिद्वार, अयोध्या, उज्जैन (महाकालेश्वर), वैष्णोदेवी, दिल्ली यांसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांना थेट जाण्याची सोय झाली आहे. यावेळी