जिंतूर येथे महाडायलिसिस केंद्राचे उद्घाटन

जिंतूर येथे महाडायलिसिस केंद्राचे उद्घाटन

ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा

परभणी :  जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात महाडायलिसिस केंद्राचे उद्घाटन परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते रविवारी,१५ जूनरोजी झाले. यावेळी बोलताना पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, या केंद्रामुळे गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील आणि त्यांना डायलिसिससाठी शहरांमध्ये जाण्याचा वेळ, पैसा आणि शारीरिक त्रास वाचेल. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण भर पडली आहे. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागेश लखमावार, वैद्यकीय अधिकारी डॉ.चांडगे रविकिरण, डॉ.संजीवकुमार पांचाळ, डॉ. दिनेश बोराळकरयांच्यासह कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!