पालकमंत्री मेघना बोर्डीकर जिंतूर, सेलू दौऱ्यावर
जिंतूर येथे डायलिसिस सेंटरचे उद्घाटन, आरोग्य रथाचे लोकार्पण करणार
परभणी : परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर या उद्या, रविवार, १५ जून, २०२५ रोजी जिंतूर, सेलू तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार असून, आरोग्य सेवेशी संबंधित महत्त्वाच्या उपक्रमांचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.
पालकमंत्री बोर्डीकर सकाळी ९:०० वाजता परभणी येथील नयनस्वप्न निवासस्थानाहून जिंतूरकडे रवाना होतील. सकाळी १०:०० वाजता जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात डायलिसीस सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. याच वेळी “वारी विठोबाची साथ आरोग्याची-एक पाऊल यॅलेसिमियामुक्ती कडे” या आरोग्य रथाचे लोकार्पणही त्या करतील.
यानंतर सकाळी ११:०० वाजता त्या श्री. राखे यांच्या घरी सांत्वनपर भेट देतील. दुपारी १२:०० वाजता त्या दादाशरीफ चौक, जिंतूर येथे उपस्थित राहतील. दुपारनंतर २:०० वाजता जिंतूर निवासस्थानी राखीव वेळ ठेवण्यात आला आहे. दौऱ्याच्या उत्तरार्धात, पालकमंत्री बोर्डीकर दुपारी ४:०० वाजता करंजी (ता.जिंतूर), सायंकाळी ७:०० वाजता वझर बुद्रुक (ता. जिंतूर) आणि त्यानंतर शिंदे टाकळी (ता. सेलू) येथे भेट देणार आहेत. या सर्व भेटी आटोपून त्या सोयीनुसार सेलू येथील नयनस्वप्न निवास येथे पोहोचतील आणि तेथे मुक्काम करतील.